प्रतिनिधी माळेगाव
आजी-माजी आमदार साहेब माळेगाव कडे झालेले दुर्लक्ष गेली पाच वर्ष तुम्ही काय काम केले याचा आढावा पूर्ण माळेगाव गावकरी मंडळींना देणे गरजेचे आहे दरवेळेस तुम्ही मतदान मागायला येतात मात्र निवडून आल्यानंतर आमच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही . माळेगाव मध्ये झालेला विकास हा तुमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहावा ही पूर्ण गावकरी मंडळींचे नम्र विनंती तुमची जलधारा योजना अजूनही पाच वर्षात पाण्याविना अपुरी आहे आपल्या सरकारने लाडकी बहीण योजनेमार्फत पंधराशे रुपये दिले मात्र त्यांच्या डोक्यावरची घागर काही तुम्ही उतरवली नाही आज माळेगाव मध्ये जलधारा अद्यापही चालू नाही .आज दोन वर्ष झाले नॅशनल मार्ग पंढरपूर हायवे चालू होऊन तरी पण त्यावरील पथदिवे चालू नाही .हाच का तुमचा विकास आजी-माजी आमदार साहेबांना विनंती आहे की तुम्ही माळेगाव साठी माळेगावच्या जनतेसाठी काय विकास केला आहे समजून सांगावे आणि हर घर जल ( अनुवाद. प्रत्येक घराला पाणी ) ही योजना भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने 2019 मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत सुरू केलेली योजना आहे ज्याचे उद्दिष्ट प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरडोई दररोज 55 लिटर नळाचे पाणी नियमितपणे पुरवण्याचे आहे. 2024 पर्यंत दीर्घकालीन आधारावर आहे पण ती 7 वर्षी झाली कागदपत्री माळेगाव मध्ये फिरत आहे हाच का विकास हे मुलभुत प्रश्न आजुण पुर्ण कधी होणार का केले नाही याचे उत्तर द्यावे नंतर मताची मागणी करावी .
