प्रतिनिधी बीड
बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना मसूरी येथील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमी येथे 2 डिसेंबर ते 27 डिसेंबर दरम्यान ट्रेनिंग साठी पाठवण्याचे आदेश मुंबई मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अवर सचिवानी काढले आहे . या दरम्यान जिल्हा अधिकारी पाठक यांना कार्यमुक्त केले जाणार आहे .पाठक यांच्या प्रशिक्षण कालावधीत बीड जिल्हा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार विभागीय आयुक्तांच्या सल्ल्याने जालना येथील जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे .
