बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्याच्या अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या परळी-बीड-नगर रेल्वे प्रत्यक्षात कधी धावणार याची सर्वांचा प्रतीक्षा लागून आहे.261 किलोमीटरच्या या रेल्वे मार्गाचे काम मागील 29 वर्षांपासून हे काम सुरू आहे.या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळून 8 लोकसभा निवडणुका झाल्या दर निवडणुकीत हा मुद्दा प्राधान्याने येतो मात्र विद्यमान काळात हे काम पूर्ण होणार असे चित्र निर्माण झाले असून
परळी तालुक्यातील सिरसाळा परिसरात खडी अंथरण्याचे काम वेगाने सुरू आहे.नगर-बीड-परळी हा रेल्वेमार्ग जिल्ह्यासाठी महत्त्वाचा विकास प्रकल्प आहे. एकूण 261 किलोमीटरच्या या रेल्वे मार्गाला सण 1995 मध्ये मंजुरी मिळाली.त्यावेळी केवळ 353 कोटी खर्च अपेक्षित होता.आजतगायत हा प्रकल्प खर्च 2800 कोटी वर जाऊन पोहचला अविकसित भागातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी या दृष्टिकाेनातून राज्य शासनाने 40 टक्के व 50 टक्के आर्थिक सहभाग देण्याचे धाेरण स्वीकारले.त्याअनुषंगाने नगर-बीड-परळी या नवीन रेल्वेमार्ग उभारण्याच्या प्रकल्पामध्ये राज्य शासनाने 50 टक्के सहभाग घेण्याचा निर्णय 18 फेब्रुवारी 2009 राेजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला हाेता.2 हजार 800 काेटींचा या प्रकल्प मध्ये मागील पाच वर्षांमध्ये नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या खर्चाच्या निधीतही वाढ झाली.या प्रकल्पास 2 हजार 826 काेटी खर्चाच्या सुधारित अंदाजपत्रकास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली.भूमी अधिग्रहणाचे काम पूर्ण होऊन अहमदनगरच्या व बीड जिल्ह्या तील काही भागात रेल्वे रूळ अंथरूण रेल्वे वाहतूक सुरू झाली असली तरी बीड कडून परळीचा दिशेने होत असलेले काम आवश्यक तेवढ्या गतीने पूर्ण होताना दिसून येत नव्हते. एकीकडे पाश्चिमात्य देशात अद्यावत तंत्रज्ञानां च्या मदतीने ताशी 5 ते 10 की.मी अंतराचे रूळ अंथरूण त्यावर लागलीच रेल्वे धावते अन आपल्या देशात 261 किलोमीटरच्या रेल्वे मार्ग पूर्ण होऊन प्रत्यक्ष रेल्वे धावण्यास 29 वर्षापेक्षा अधिक काळ पूर्ण झाला आहे. येणाऱ्या नवीन वर्षात हे काम पूर्णत्वास येऊन प्रत्यक्षात रेल्वे धावण्याचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची शक्यता दिसून येत आहे.बीड कडून परळीच्या दिशेने सिरसाळा परिसरात या रेल्वे मार्गावर खडी अंथरण्याचे काम प्रगती पथावर सूरु झाल्याने येणाऱ्या नवीन वर्षात परळी-बीड रेल्वेचे स्वप्न पुर्णत्वास येईल असे दिसून येत आहे
