Homeताज्या बातम्याप्रकाश आंबेडकरांना "परिस" का म्हणतात ? 

प्रकाश आंबेडकरांना “परिस” का म्हणतात ? 

प्रतिनिधी

परिस ही संकल्पना लोखंडांचं सोन करणारी आहे. लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचे सोने होते असा समज आहे.

राजकारणात निवडून येण्यासाठी गडगंज पैसा आणि समाजात नावलौकिक असला पाहिजे तद्वतच निवडून येण्यासाठी जातीची भरभक्कम मते असली पाहिजे अर्थात तुमची जात संख्येने मोठी पाहिजे असा समज रुढ झाला आहे. आणि म्हणूनच मग छोट्या छोट्या जातीचे आणि परिस्थितीने गरीब असलेले लाखो होतकरू निवडणुकीच्या रिंगणातुन बाद झालेले आहेत हे लोकशाहीच्या ७२ वर्षाच्या अनुभवाने सिद्ध केले आहे…!! अशा परिस्थितीत १९९२-९३ साली नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक लागली, त्या निवडणुकीत भारिप ने आदिवासी समाजातील भिमराव केराम या गरीब तरुणाला निवडणुकीत ऊभे केले, त्याच्या साठी आठवडी बाजारातून वर्गणी गोळा केली आणि भिमराव केराम या गरीब आदिवासी तरुणाला आमदार म्हणून निवडून आणले, आदिवासी समाजातील गरीब तरुणाच्या जीवनाचं, कुटुंबाचं सोनं झालं.अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू मतदारसंघातून अतिशय छोट्या कोळी समाजाचे डॉ. डी. एम. भांडे यांना भारिप बहूजन महासंघाने अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष बनविले, आणि त्यांना १९९९ साली आमदार म्हणून निवडून आणले, ते २००० सालच्या विलासराव देशमुख मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री होते, त्यांच्या जीवनाचे सोने झाले…!!

१९९९ साली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघातून “बारी” या छोट्याशा जातीचे परिस्थितीने अतिशय गरीब असलेले रामदास बोडखे यांना भारिप बहूजन महासंघाने उमेदवारी दिली, निवडणुक खर्चासाठी पैसा दिला, मते दिली आणि निवडून आणले ते विलासराव देशमुख मंत्रीमंडळात रोजगार हमी राज्यमंत्री म्हणून मंत्री होते, त्यांच्या जीवनाचे सोने झाले…!!

अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील माळी समाजाचे बळीराम सिरस्कार अतिशय गरीब कुटुंबातील त्यांना भारिप बहूजन महासंघाने अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष बनविले तथा दोन वेळा बाळापूर मतदार संघाचे आमदार बनविले, बळीराम सिरस्कार यांच्या जीवनाचे,आणि कुटुंबाचे सोने झाले…!! अकोला जिल्हा परिषदमध्ये मुस्लिम समाजातील “कासार” या छोट्याशा जातीतील अतिशय गरीब कुटुंबातील सौ. साबिया अंजुम सौदागर या महिलेला भारिप बहूजन महासंघाने अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष पदी विराजमान केले ,त्यांची राजकीय पत निर्माण झाली आणि त्यांच्या जीवनाचे सोने झाले…!!

जळगांव जामोद येथील वृत्तपत्र विकणारा गरीब बौद्ध तरुण संजय पारवे याला भारिप बहूजन महासंघाने उमेदवारी दिली नगरसेवक म्हणून निवडून आणले आणि जळगांव नगरपरिषदेचे उपाध्यक्ष बनविले,त्याची राजकीय पत निर्माण झाली,तो नेता म्हणून ऊभा राहिला त्याच्या जीवनाचे सोने झाले…!!

भटक्या विमुक्त जाती समुहातील “वडार”समाजाच्या सौ. अनिता अव्वलवार यांना भारिप बहूजन महासंघाने मुर्तिजापूर नगर परिषदेच्या अध्यक्षा बनविले आणि त्यांच्या जीवनाचे सोने झाले…!!

अतिशय गरीब कुटुंबातील भटक्या विमुक्त जमाती मधील “पाथरवट” समाजाच्या सौ. कविताताई ढाळे यांना भारिप बहूजन महासंघाने उमेदवारी दिली निवडून आणले आणि पातुर पंचायत समिती उपसभापती बनविले त्यांच्या जीवनाचे सोने झाले…!!

अकोला जिल्हा परिषद मध्ये अतिशय छोट्या तेली समाजाचे बालमुकुंद भिरड यांना भारिप बहूजन महासंघाने उमेदवारी दिली, निवडून आणले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष बनविले,त्यांची राजकीय पत निर्माण झाली,त्यांची नेता म्हणून ओळख निर्माण झाली, त्यांच्या जीवनाचे सोने झाले…!!

अतिशय गरीब, बौद्ध समाजातील प्रतिभाताई भोजने यांना भारिप बहूजन महासंघाने उमेदवारी दिली, निवडून आणले आणि अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष बनविले, त्यांच्या जीवनाचे सोने झाले…!!

वरील उदाहरणे ही प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत, गेली चाळीस वर्षे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे अशाप्रकारे अनेक प्रयोग करीत आहेत आणि अतिशय छोट्या छोट्या जात समुहाचे, गरीब कुटुंबातील लोकप्रतिनिधी निवडून आणतं आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष,सभापती,पंचायत समिती सभापती, उपसभापती,सरपंच अशी विविध राजकीय पद ऊपभोगायला मिळतं आहेत.आणि त्यांच्या जीवनाचं सोनं होतं आहे म्हणून आशावादी जनता, छोट्या छोट्या जात समुहातील ओबीसी तरुण तथा आदिवासी,भटके विमुक्त प्रकाश आंबेडकर यांना परिस या उपाधीने संबोधतात…!!

जे राजकीय पद आणि प्रतिष्ठा याची कल्पना सुद्धा केली नव्हती, ती श्रीमंतांची, आणि जातदांडग्यांची मक्तेदारी आहे असे वाटतं होते ते पद आणि ती प्रतिष्ठा प्राप्त होतं असेल तर ती बाब कल्पनातीत असते आणि म्हणूनच मग गरीब,होतकरु छोट्या छोट्या जात समुहातील भटके विमुक्त,आदिवासी,मायक्रो ओबीसी प्रकाश आंबेडकर यांना परिस समजतात आणि परिस म्हणूनच त्यांच्याकडे बघतात…!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आयफोन 16 प्रो, आयफोन 16 प्रो मॅक्स फ्लिपकार्टवर सवलतीच्या किंमतीवर उपलब्ध आहेत: ऑफर पहा

Apple पलच्या नवीनतम स्मार्टफोन लाइनअपमधील आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स क्राउन ज्वेल्स आहेत. ही डिव्हाइस सहसा प्रीमियम किंमतीची आज्ञा देतात, परंतु...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9A621302.1750474355555.27B59A44 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750473606.6A4E117 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61D1002.1750472894.15DB90CD Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750466901.6A058F4 Source link

आयफोन 16 प्रो, आयफोन 16 प्रो मॅक्स फ्लिपकार्टवर सवलतीच्या किंमतीवर उपलब्ध आहेत: ऑफर पहा

Apple पलच्या नवीनतम स्मार्टफोन लाइनअपमधील आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स क्राउन ज्वेल्स आहेत. ही डिव्हाइस सहसा प्रीमियम किंमतीची आज्ञा देतात, परंतु...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9A621302.1750474355555.27B59A44 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750473606.6A4E117 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.61D1002.1750472894.15DB90CD Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750466901.6A058F4 Source link
error: Content is protected !!