केज/प्रतिनिधी
शेतातील पंपाचे रीतसर कोटेशन भरलेले असताना ही डीपी वरून वीज कनेक्शन घेवून कृषी पंप चालवण्यास विरोधकरून एका शेतकऱ्याला नऊ जणांनी मारहाण केल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे.या प्रकरणी नऊ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की,दि.२४ नोव्हेंबर रोजी केज तालुक्यातील साळेगाव पासून जवळ असलेल्या लोखंडे वस्ती वर राहणारे बालासाहेब रामचंद्र जाधव यांना त्यांचे शेता शेजारी असलेले वचिष्ठ बळीराम जाधव,विनोद वचिष्ठ जाधव,महादेव सखाराम जाधव,अभिजीत महादेव जाधव,मकुंद दत्तात्रय जाधव,अजय मुकुंद जाधव,मंगल महादु जाधव, रंदावणी वचीष्ठ जाधव आणि अशोक गोरखनाथ जाधव यांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडळी जमा करून घरा समोर आले.व त्यांनी आवाज देवुन बालासाहेब जाधव यास घराचे बाहेर अंगणात बोलावुन घेतले आणि वचिष्ठ बळीराम जाधव हा म्हणाला की,”तु डीपी वरुन मोटार का चालवितो ?”असे म्हणुन शिवीगाळ केली.त्यावर बालासाहेब त्यांना म्हणाले की, “माझे कोटेशन आहे. मी मोटार चालविणार.” असे म्हणताच विनोद जाधव त्यांना म्हणाला की,”तु लई माजलास तुला मी बघुन घेतो.”असे म्हणुन वचीष्ठ जाधव याने तेथेच असलेले लोखंडी रॉड घेवुन बालासाहेब याच्या डाव्या हातावर मारुन जखमी केले.बालासाहेब यांची पत्नी सविता व मुलगा वैभव हे त्यांना आम्हाला मारुनका असे म्हणत होते,परंतु त्यांनी काहीएक न ऐकता विनोद जाधव व मुकुंद जाधव यांनी त्यांच्या हातातील लाकडी काठीने व अभिजीत जाधव याने त्याचे हातातील वायरने पत्नी सविता,मुलगा वैभव यांना मारहाण करुन जखमी केले.या भांडणात बालासाहेब जाधव यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला आहे.बालासाहेब जाधव यांच्या तक्रारी वरून दि.२८ नोव्हेंबर रोजी वचिष्ठ जाधव,विनोद जाधव,महादेव जाधव,अभिजीत जाधव,मुकुंद जाधव, अजय जाधव,मंगल जाधव,रंदावणी जाधव,अशोक जाधव सर्व राहणार लोखंडे वस्ती यांच्या विरुद्ध केजपोलीस ठाण्यात गु.र.नं.६२८/ २०२४ भा.न्या.सं.११५ (२),११८(१)१८९(२), १९०, १९१ (२),३५१(२),३५१(३),३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर हे पुढील तपास करीत आहेत.
