प्रतिनिधी
Mega Rafale Fighter Jets Deal : राफेल हे भारताचं अत्याधुनिक फायटर विमान आहे. 4.5 जनरेशनची ही विमानं भारताने फ्रान्सकडून विकत घेतली आहेत. आता भारत फ्रान्सकडून आणखी अशी विमान विकत घेणार आहे. भारत सैन्य दलाच्या कुठल्या विभागासाठी? ही विमानं विकत घेणार आहे. किती लाख कोटीचा हा करार असेल?.
अमेरिकेकडून भारताला लवकरच घातक शस्त्र मिळणार आहे. सीमेवरील दहशतवादी कारवाया लक्षात घेता हे शस्त्र गेमचेंजर ठरणार आहे. कारण शत्रुला समजण्याआधीच अचूक वार करण्याची या शस्त्राची क्षमता आहे. हे आहेत, अमेरिकेचे MQ-9B प्रीडेटर ड्रोन्स. भारताने काही महिन्यांपूर्वी अमेरिकेसोबत 31 सशस्त्र MQ-9B प्रीडेटर ड्रोन्स खरेदीचा करार केला आहे. फक्त टेहळणीच नाही, तर काही हजार फूट उंचीवरुन अचूक हवाई हल्ला करणाऱ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज ड्रोन्स भारताला मिळणार आहेत. अफगाणिस्तान युद्धात अमेरिकेने या MQ-9B प्रीडेटर ड्रोन्सची क्षमता दाखवून दिली आहे. भारताने अमेरिकेसोबत करार केला आहेच, पण आता लवकरच फ्रान्ससोबत दोन मेगा डीलवर स्वाक्षरी होऊ शकते. भारत फ्रान्सकडून 26 राफेल मरीन फायटर जेट्स आणि तीन अतिरिक्त स्कॉर्पियन वर्गाच्या पाणबुड्या खरेदी करार करण्याच्या तयारीत आहे.
