Homeताज्या बातम्याशपथविधीसाठी मैदानाची पाहणी करायला एकाच पक्षाचे नेते कसे गेले?, देवेंद्र फडणवीस यांना...

शपथविधीसाठी मैदानाची पाहणी करायला एकाच पक्षाचे नेते कसे गेले?, देवेंद्र फडणवीस यांना मेसेज; शिंदे गटाच्या नेत्याची जाहीर नाराजी

 येत्या पाच डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली.

येत्या पाच डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. भाजप हा विधानसभा निवडणूक निकालात सर्वात मोठा पक्ष ठरल्यानं मुख्यमंत्री भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र अजूनही गृहमंत्रिपदाचा पेच कायम आहे. एकीकडे एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे भाजपला देखील गृहमंत्रिपद हवं आहे, अशी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची देखील चर्चा आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

नेमकं काय म्हणाले दीपक केसरकर? 

5 तारखेला शपथविधी होणर आहे. मात्र त्यापूर्वी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. म्हणून मी ही पत्रकार परिषद घेत आहे. एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. आज बैठक रद्द झाली वैगेरे अशा बातम्या येत आहेत. परंतु आज कोणतीही बैठक नव्हती. शिंदे साहेबांची तब्येत ठीक नाहीये, जो काही निर्णय होइल तो मान्य असेल हे त्यांनी आधीच सांगितले आहे, असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, विरोधकांना अतिशय कमी जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता विरोधक वेगवेगळी कारण शोधत आहेत. शपथविधीची तारीख ठरली आहे, मात्र तरी देखील काही गोष्टी विनाकारण बाहेर येत आहेत. काहीतरी तर्क काढायचा आणि बातमी बनवायची हे थांबलं पाहिजे. पक्षातल्या नेत्यांनी देखील कमेंट करणं थांबवा. आमच्याकडून कोणताही उशीर झालेला नाही. ज्या वेळी बैठक ठरेल तेव्हा ते इकडे ही बसतील आणि दिल्लीलाही जातील असं केसरकर यांनी म्हटलं आहे .

शपथविधी मैदानाच्या पाहाणीवरून केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मी फडणवीसांना मेसेज केला, की महायुतीची सत्ता येत आहे. पण मैदानाची पहाणी करायला एकाच पक्षाचे नेते जातात. त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा मेसेज जातो. आम्हालाही कळवलं असत तर आम्हीही आलो असतो. याबाबत मी देवेंद्रजींना भेटायला जाणार होतो, मात्र ते आराम करत असल्याने भेट होऊ शकली नाही. जनतेने गैरसमज करु नये. आम्ही शंभर टक्के एकत्र आहोत असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9A621302.1750649652.30169614 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750647424.9A7432B Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750643718.9A460E3 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750637027.99F42A9 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9A621302.1750649652.30169614 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750647424.9A7432B Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750643718.9A460E3 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5D1D1002.1750637027.99F42A9 Source link
error: Content is protected !!