प्रतिनिधी बीड
शासकीय रुग्णालय बीड
च्या शल्य चिकित्सक व पोलीस चौकीच्या विद्यमाने मुख्य गेटवर रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा-ॲड.सदानंद वाघमारे.
बीड(प्रतिनिधी) शासकीय जिल्हा रुग्णालय च्या मुख्य गेटवर पोलीस चौकी व शल्यचिकित्सकाच्या आशीर्वादाने अतिक्रमण होत असून याकडे नगरपरिषद बीड मुख्याधिकारी व शासकीय जिल्हा रुग्णालयाची जिल्हा समिती व पोलीस चौकी यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण होत असून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ॲड.सदानंद वाघमारे यांनी केला आहे. या ठिकाणाहून नेहमीच रुग्णांची व नातेवाईकांची ये-जा होत असते. या ठिकाणी रस्त्यावरच मुख्य गेटवर अशा प्रकारचे अतिक्रमण होणे म्हणजे वाहतुकीला अडथळा होत असून सामान्य नागरिकांना यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. तरी जिल्हा प्रशासनाने सदरचे अतिक्रमण तात्काळ काढून घेण्याची मागणी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ॲड.सदानंद वाघमारे यांनी वाघमारे यांनी कळविले आहे.
