प्रतिनिधी बीड
बलभीम नगर बुद्ध विहार शिवाजी नगर बीड येथे 26/11/24 रोजी अंजली विशाल वडमारे, अंजली तेजस वडमारे यांनी संविधान दिना निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात निशांत वडमारे, अमित विद्यागार व अधिरा वडमारे यानी संविधान दीना निमित्त थोडक्यत मनोगतव्यक्त केले त्यानंतर ॲड तेजस वडमारे यांनी बोलताना संविधान दिनाचे सविस्तर महत्व सांगून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात जगातील सर्वात मोठे हस्त लिखित संविधन तयार करून आजच्या दिवशी दिले आहे या संविधानाची विशेषता ही आहे क येथे मागील 75 वर्षांपासून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहत आहेत त्यामुळे भारतीय संविधान हे धर्मनिरपेक्षच आहे कारण संविधानाने प्रत्येकाल धार्मिक स्वातंत्र्य, श्रद्धा, उपासना करण्याचा अधिकार दिलेला आहे त्या नंतर त्यानी पुढे बोलताना सांगितले की संविधानाने प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आपण संविधानाची उद्देशिका पाहिली तर सर्वप्रथम त्यामध्ये न्याय दिलेला आहे, त्यानंतर स्वातंत्र्य, समानताव बंधुता हे मूल्य दिलेली आहेत,
हजारो वर्षापासून शोषित पीडित लोकांना आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दिलेली आहे त्यामुळे हे भारतीय संविधान जगातील उत्कृष्ट संविधान आहे असे मोलाचे मार्गदर्शन करून संवधानाच्या उद्देशीकेचे सामूहिक वाचन करून बलभीम नगर बुद्ध विहारात संविधन दिन उत्साहात साजरा करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाला अंजली विशाल वडमारे, अंजली तेजस वडमारे, आचल वडमारे, पद्मिणीबाई वडमारे, आशाबाई भालेराव, आरोही अंकुटे, अदिती धनवे,अमित विद्यागर, निशांत वडमारे, आमय वडमारे गोलू विद्यागार, अधिरा वडमारे,पृथ्वी भालेराव, सद्धार्थ विद्यागर, नितीन भालेराव, सिद्धार्थ वडमारे, सेनापती वडमारे, मंगेश वडमारे व परिसरातील सर्व संविधान रक्षक बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते
