प्रतिनिधी केज– आगामी नगरपंचायत,नगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता सर्व पक्षाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.त्यात बीड जिल्ह्यात युवकांचे मोठे संघटन असणारे ॲड.प्रशांत पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बीड जिल्हा कार्याध्यक्ष पदी युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी नियुक्ती करत जिल्ह्यात युवकांचे मोठे संघटन उभा केले आहे.
ॲड.प्रशांत पवार यांनी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये निष्ठावंत म्हणून उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांच्या कामाची पावती म्हणून तसेच युवकांचे संघटन व तालुक्यातील युवकांची मोठी बांधणी पाहून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तथा युवकांचे प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख यांनी जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली असल्याचे बोलले जात आहे.
बीड जिल्हा युवक कार्याध्यक्ष पदी नियुक्ती केल्याबद्दल खा.शरदचंद्रजी पवार, सुप्रियाताई सुळे ,प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील ,खासदार बजरंग (बप्पा) सोनवणे, मा.आमदार पृथ्वीराज साठे, डॉ.नरेंद्र काळे, राजेभाऊ फड, व्यंकटेशजी चामणर , अमर (भैय्या) देशमुख, अंकुशरावजी ढोबळे या सर्वांचे आभार मानले आहेत.
चौकट :- येणाऱ्या काळात शिव, शाहू, फुले,आंबेडकर, आण्णाभाऊ यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी व शरदचंद्रजी पवार यांचे विचार युवकांपर्यंत पोहचवण्याचे काम प्रामाणिकपणे करत राहील :- ॲड.प्रशांत पवार
