येवला प्रतिनिधी ।
ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने प्रांताधिकार्यांना निवेदन देण्यात आले .महाराष्ट्र सरकार एसी प्रवर्गामध्ये अ ब क ड वर्गीकरणाचा घाट घालून समाजात दुही माजविण्याचा प्रयत्न करित आहे असा आरोप करीत ऑल इंडिया पॅंथर सेनेने येवला प्रांताधिकार्यांना निवेदन देत शासनाचा निषेध केला आहे. अनुसूचित जातीमधील 59 जातींना दिशाभूल करून फसविण्याचा मनुवादी शासनाचा डाव असल्याचा यावेळी आरोप करण्यात आला.निवेदनादरम्यान ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष नासिक शहर ग्रामीण अध्यक्ष संदीप पगारे म्हणाले की अनुसूचित जातीतील एकूण साठ जातींमध्ये जातीय संघर्ष पेटावा यादृष्टीने शासन काम करीत आहे नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत असताना सरकार आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या नावाखाली जाती-जाती भांडणे लावून आपली पोळी भाजत आहे काही विघ्नसंतोषी जातीय पुढारी शासनाचे बाहुले बनून कटपुतली डाव खेळून सरकारच्या तालावर नाचत आहे व आपल्या जातीची फसवणूक करीत आहेत,या पुढार्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये जातीचे भले करण्याचा काडी मात्र अनुभव व क्षमता नाही .शासनाच्या भूलथापांना बळी न पडता नव्या पिढीने व सुशिक्षित तरुणांनी सदसदविवेक बुद्धीचा वापर करून सर्व जातीय एकजुटीचा शिव शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊंच्या वैचारिक एकीचा हिसका सरकारला दाखवावा असे आवाहन पगारे यांनी केले. यावेळी उपविभागीय कार्यालयातील हिरे मॅडम यांना सदरील निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित.. ऑल इंडिया पॅंथर सेना नाशिक शहर ग्रामीण अध्यक्ष श्री संदीप भाऊ पगारे व तालुका अध्यक्ष रवी अण्णा गुंजाळ उपतालुका अध्यक्ष संतोष भाऊ कहार येवला शहराध्यक्ष पापा भाई शेख. उपजिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक मुश्रीफ भाई पठाण मनोज भालेराव इमरान शेख धम्मानंद सोनकांबळे ज्ञानेश्वर गुंजाळ विकास लहरे प्रदीप साळवे समाधान गुंजाळ योगेश झालटे शाहरुख भाई शेख अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष. तुषार सोनवणे नितीन भाऊ इम्रान पठाण इमरान शेख ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..!!






