डिजिटल 7/12 चे जनक ठरलेले अपर जिल्हाधिकारी रामदास जगताप ACB च्या जाळ्यात


नवी मुंबई : महसूल विभागात डिजिटल 7/12 प्रणाली राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि सध्या नवी मुंबई येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेले रामदास हरिभाऊ जगताप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सिडकोच्या साडेबावीस टक्के योजनेतील जमिनीच्या करारासाठी (Agreement) कथितरीत्या २२ हजार ५०० रुपयांची लाच मागण्यात आली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला.

 

१३ मे २०२६ रोजी नवी मुंबई येथील सिडको कार्यालयात ACB च्या पथकाने कारवाई करत रामदास हरिभाऊ जगताप यांना रंगेहाथ पकडले. यावेळी त्यांच्या सांगण्यावरून शिपाई हरेश सोनवणे यांनी लाचेची रक्कम स्वीकारल्याचे समोर आले असून त्यांनाही सहआरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे.

 

प्रकरणातील महत्त्वाचे मुद्दे :

आरोपी अधिकारी : रामदास हरिभाऊ जगताप

पद : अपर जिल्हाधिकारी, नवी मुंबई

कारवाई करणारी यंत्रणा : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB)

अटक दिनांक : १३ मे २०२६

लाचेची रक्कम : २२ हजार ५०० रुपये

ठिकाण : सिडको कार्यालय, नवी मुंबई

सहआरोपी : हरेश सोनवणे (शिपाई)

प्रकरण : सिडकोच्या २२.५ टक्के योजनेतील जमिनीच्या करारासाठी लाच मागितल्याचा आरोप

रामदास जगताप हे महसूल विभागात डिजिटल 7/12 प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे विशेष चर्चेत आले होते. मात्र, या कारवाईनंतर त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.

 

दरम्यान, जांबुत हे त्यांचे मूळ गाव असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.


2
कृपया वोट करा

दैनिक निपुण प्रभात च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!