जागे व्हा जागे व्हा मुख्याधिकारी जागे व्हा : बीड नगरपालिका


प्रतिनिधी बीड

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी शहरात पसरलेल्या अस्वच्छतेच्या निषेधार्थ आज बीडमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले.
शहरातील तुंबलेल्या नाल्या, ठिकठिकाणी साचलेला कचरा तसेच मिरवणुकीदरम्यान रस्त्यावर आलेल्या नाल्याच्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर आज सकाळी ११ वाजता बीड नगरपालिका समोर आंबेडकरी अनुयायांनी एकत्र येत निषेध नोंदवला.
या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निष्काळजी कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त केला. “स्वच्छता सभापती राजीनामा द्या”, “बीड नगरपालिका जागे व्हा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्या मांडताना शहरात तात्काळ स्वच्छता मोहीम राबवावी, तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच स्वच्छता सभापतींनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाने माननीय मुख्याधिकारी शैलेश फडसे सरांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.


1
कृपया वोट करा

दैनिक निपुण प्रभात च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!