आंबेजोगाई प्रतिनिधी
कृषी महाविद्यालय, अंबाजोगाई
आढावा बैठक
कृषी महाविद्यालय अंबाजोगाई येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा साहेब यांच्या समवेत महाविद्यालयातील प्रस्तावित व सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली.
यावेळी महाविद्यालयाच्या प्रगतीसंदर्भातील विविध बाबींचा आढावा घेत आवश्यक सुविधा, अडचणी व भविष्यातील गरजांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, पायाभूत सुविधा बळकटीकरण तसेच विद्यार्थ्यांसाठी अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव बंटेवाड सर, कृषी तंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य खळगे सर तसेच सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
कृषीमहाविद्यालय अंबाजोगाई आढावाबैठक कृषीशिक्षण शैक्षणिकविकास विद्यार्थीकल्याण पायाभूतसुविधा शैक्षणिकगुणवत्ता






