तांबवा येथे भीमजन्मोत्सव २०२६ उत्साहात साजरा; विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद


तांबवा केज प्रतिनिधी

भीमजन्मोत्सव २०२६ निमित्त भिमरत्न युवा प्रतिष्ठान, तांबवा तर्फे आयोजित कार्यक्रम उत्साहात व यशस्वीपणे पार पडला. तांबवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व गणेश माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाला गावाचे सरपंच, शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्धपणे सहभाग घेत संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

या प्रसंगी विविध भाषणांचे आयोजन करण्यात आले. विशेषतः अलका लांब मॅडम यांनी साकारलेली रमाईंची भूमिका अत्यंत प्रभावी ठरली. त्यांच्या भावनिक सादरीकरणामुळे उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू दाटले आणि सर्वांनी त्यांच्या अभिनयाचे मनापासून कौतुक केले.

तसेच कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तर सर्व विद्यार्थ्यांना एक वही व एक पेन वाटप करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहारही देण्यात आला.

भिमरत्न युवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी समन्वय साधत हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा मिळाली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 


1
कृपया वोट करा

दैनिक निपुण प्रभात च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!