पोलिसांनो, बदलीसाठी नेत्यांनी फोन केल्यास कारवाई..


प्रतिनिधी बीड

पोलिसांनो, बदलीसाठी नेत्यांनी फोन केल्यास कारवाई..अशी भूमिका बीडच्या पोलिस अधीक्षक नवनीत कावत साहेबांकडून घेण्यात आलेली आहे…

बदलीसाठी कोणत्याही राजकीय किंवा बाह्य दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास, संबंधित अंमलदाराविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे…

तसेच, ज्यांच्यावर आधीच शिस्तभंगाची कारवाई आहे किंवा जे नुकतेच निलंबनातून मुक्त झाले आहेत, त्यांच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाहीअसं देखील कळते आहे..

या नियमांचे पालन झाल्यास शिस्तप्रिय पोलिस खाते म्हणून नक्कीच बीड पोलिसांची ओळख निर्माण होऊ शकते.. या निर्णयाचे स्वागत नक्कीच पोलिस बांधव देखील करतील…


2
कृपया वोट करा

दैनिक निपुण प्रभात च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!