केज प्रतिनिधी
खासदार बजरंग बाप्पा थेट देशाच्या केंद्रीय कृषिमंत्र्यांना भेटले.. बीड जिल्ह्याचा पीकविमा आणि मराठवाड्याचा दुष्काळ प्रश्न त्यांनी केंद्राकडे मांडला… आज नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषि एवं किसान कल्याण मंत्री मा. Shivraj Singh Chouhan यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मराठवाडा, विशेषतः बीड जिल्ह्यातील गंभीर कृषी परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली व खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी निवेदन सादर केले…गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाडा दुष्काळ, अतिवृष्टी व अवकाळी पावसाच्या सततच्या संकटांना सामोरे जात आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. बीड जिल्ह्यातील परिस्थिती विशेषतः चिंताजनक असून अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत….या पार्श्वभूमीवर मा. केंद्रीय मंत्र्यांकडे खालील महत्त्वाच्या मागण्या मांडल्या:▪️ मराठवाडा (बीडसह) विशेष आपदाग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करावे▪️ फसल नुकसान भरपाई तातडीने व थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी▪️ पंचनामे वेळेत, पारदर्शक व जबाबदारीने करण्याची प्रभावी यंत्रणा उभी करावी▪️ प्रधानमंत्री फसल बीमा योजना अधिक प्रभावी करून दावे वेळेत व सुलभ प्रक्रियेद्वारे निकाली काढावेत▪️ पिकांना “उत्पादन खर्च + 50% नफा” या सूत्रावर हमीभाव (MSP) निश्चित करावा▪️ फसल बीमा योजनेतील ‘ट्रिगर पॉइंट’ पुन्हा लागू करून वास्तव नुकसानानुसार भरपाई द्यावी▪️ मा. मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली ₹17,000 प्रति हेक्टर मदत बीड जिल्ह्यात तात्काळ वितरित करावी▪️ शेतकरी कर्जावरील व्याजमाफी व कर्ज पुनर्गठनासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे▪️ कायमस्वरूपी उपाय म्हणून सिंचन प्रकल्पांना गती देऊन पाण्याची उपलब्धता वाढवावी▪️ शेतमालासाठी हमीभावासोबतच योग्य बाजारपेठ, साठवण व प्रक्रिया सुविधा उपलब्ध करून द्याव्यातशेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यांच्या प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय घेऊन दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याकडून करण्यात आली…






